२४ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२४ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
उत्तरः १ मे १९६०

२) कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते?
उत्तरः अमरावती

३) भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक बारसा आहे?
उत्तरः तामिळनाडू

४) भारतातील पहिली रेल्वे १८५३ साली कोणत्या मागनि धावली ?
उत्तरः मुंबई-ठाणे

५) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार………येथे आहे.
उत्तरः नवी दिल्ली

६) मुळ रेखावृत्त-कोणत्या देशातून जाते?
उत्तरः इंग्लंड

७) मिनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे?
उत्तरः तामिळनाडू

८) उस्मानाबाद जिल्ह्यात….. येथे जैन मुनी शांतीसागर यांची समाधी आहे.
उत्तरः कुंथलगिरी

९) डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे?
उत्तरः भारत व चीन

१०) दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात स्थित आहे?
उत्तरः नागपूर

११) कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
उत्तरः गोदावरी

१२) मांगेलि धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे?
उत्तरः दौडामार्ग

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

१३) भारतीय पठारावरील कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे?
उत्तरः नर्मदा

१४) भीमा-कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः पुणे

१५) प्रस्तावित जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः रत्नागिरी

१६) अतिपर्जन्याचा जांभाविरहित विभाग ……..मध्ये आहे.
उत्तरः उत्तर कोकण

१७) महाराष्ट्रातील भुगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून……..ओळखला जातो.
उत्तरः कोयना

१८) नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट (NARI) कोठे आहे?
उत्तरः भोसरी

१९) सातारा, सांगली व कोल्हापूर ही शहरे नदीच्या खोऱ्यात वसली आहेत.
उत्तरः कृष्णा

२०) महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?
उत्तरः कोल्हापूर ते गोंदिया

२१) नागझिरा अभयारण्य कोठे आहे?
उत्तरः गोंदिया

२२) आंबा घाट कोठून कोठे जाताना येतो?
उत्तरः कोल्हापूर ते रत्नागिरी

२३) नॅशनल डिफेन्स अॅकॅडेमी कोठे आहे?
उत्तरः खडकवासला

२४) कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
उत्तरः रायगड

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२५) उजनी धरण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः माढा

२६) “लोणार” हे उल्काजन्य सरोवर या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः बुलढाणा

२७) महाराष्ट्रातला पहिला सोने शुध्दीकरण कारखाना या ठिकाणी आहे ?
उत्तरः धुळे, शिरपूर

२८) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
उत्तरः तोरणमाळ

२९) धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे?
उत्तरः साक्री

३०) कोणते नगर / शहर धुळे जिल्ह्यात नाही ?
उत्तरः शहादा

३१) धुळे जिल्ह्यातून कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ?
उत्तरः रा.म.क्र. ६

३२) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली ?
उत्तरः भ्रंशमूलक उद्रेक

३३) नागपूर जिल्ह्यात कोराडी, खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे?
उत्तरः औष्णिक विद्युत केंद्र

३४) त्र्यंबकेश्वर हे कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?
उत्तरः गोदावरी

३५) मुळा, मुठा, घोड, नीरा, सिना, इंद्रायणी, कुकडी व कऱ्हा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?
उत्तरः भिमा

३६) सातपुडा पर्वतातील प्रमुख नदी ….
उत्तरः तापी

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३७) भारतात एकूण ……….राज्ये आहेत. पैकी महाराष्ट्र राज्यात एकूण………जिल्हे आहेत?
उत्तरः २८,३६

३८) विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे?
इगतपुरी

३९) त्र्यंबक (नाशिक) येथे पुढील कुंभमेळा कोणत्या वर्षी आहे?
उत्तरः २०२७

४०) कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते?
उत्तरः गोदावरी

४१) नाशिक जिल्ह्यातून वाहणारी नदी नाही ?
उत्तरः वैनगंगा

४२) NH-3 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो ?
उत्तरः मुंबई-आग्रा

४३) नाशिक जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
उत्तरः १५

४४) वाशिम जिल्ह्याची समुद्र सपाटीपासूनची सरासरी उंची किती आहे?
उत्तरः ४५० मी.

४५) पालघर जिल्ह्यात . . या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली.
उत्तरः सातपाटी

४६) दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
उत्तरः जव्हार

४७) पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः डहाणू

४८) महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ?
उत्तरः विदर्भ

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४९) महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
उत्तरः नाशिक

५०) महाराष्ट्रात सर्वाधिक जंगलक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
उत्तरः गडचिरोली

५१) लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः पुणे

५२) परळी वैजनाथ हे ज्योर्तिलिंगस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः बीड

५३) कोणत्या पर्वत रांगेत ‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण आहे?
उत्तरः सातपुडा

५४) महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी कोणती ?
उत्तरः गोदावरी

५५) बल्लारपूर हे ….. नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे.
उत्तरः वर्धा

५६) महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती ?
उत्तरः पानझडी

५७) कोणते तळे चंद्रपूर जिल्हयात नाही?
उत्तरः नवेगाव

५८) नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तरः गोंदिया

५९) ‘आगाखान पॅलेस’ येथे कस्तुरबांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रांत…….येथे आहे.
उत्तरः पुणे

६०) ‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
उत्तरः पेट्रोलियम

Maharashtra General Knowledge Questions
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२३ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x