१७ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१) संवादाच्या माध्यमातून व्यवहारासाठी नुकतेच काय लाँच करण्यात आले आहे ?
उत्तर- हॅलो UPI
२) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच कशाचा शुभारंभ केला आहे ?
उत्तर- ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स
३) कोणत्या देशात ‘आंतरराष्ट्रीय ओलंपियाड फॉर इन्फोमेट्रिक्स’ चे आयोजन करण्यात आले ?
उत्तर- हंगरी
४) ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन’ केव्हा होता ?
उत्तर- १० सप्टेंबर
५) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच काय सुरू केले आहे ?
उत्तर- ग्लोबल बायोफ्यूल अलायन्स.
६) नुकत्याच झालेल्या G20 परिषदेत कोणाला कायमचे सदस्यत्व मिळाले आहे ?
उत्तर- आफ्रिकन युनियन.
७) कोणत्या देशाने अलीकडे सलग दुसऱ्यांदा जगातील सर्वोत्तम देशाचा किताब पटकावला ?
उत्तर- स्वित्झर्लंड.
८) नुकतेच कोणत्या रेल्वे स्थानकाचे ‘शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन’ असे नामकरण केले जाईल ?
उत्तर- उधमपूर.
९) उधमपूर रेल्वे स्थानकाचे नवे नाव काय ?
उत्तर- शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन.
१०) ‘स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप 2023’ कुठे आयोजित केला जाईल ?
उत्तर- चेन्नई.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) कोणत्या बँकेने अलीकडेच UPI ATM सुविधा सुरू केली आहे ?
उत्तर- बँक ऑफ बडोदा.
१२) अलीकडेच ‘लक्ष्मी कुमारी चुंडावत बालसाहित्य पुरस्कार’ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?
उत्तर- अद्वैत जिंद.
१३) ८ सप्टेंबरला कोणता दिवस साजरा करण्यात आला ?
उत्तर- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
१४) आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये (२०२३) भारतीय संघाने कोणते पदक जिंकले ?
उत्तर- कांस्य पदक
१५) आंतरराष्ट्रीय पोलिस सहकार्य दिन केव्हा साजरा करण्यात आला ?
उत्तर- ७ सप्टेंबर
१६) इजिप्तमध्ये ब्राइट स्टार-२३ सरावात कोणी भाग घेतला ?
उत्तर- INS सुमेघा.
१७) अलीकडेच, भारतातील पहिल्या सौर शहराचे उद्घाटन कोणत्या राज्यात होणार आहे ?
उत्तर- मध्य प्रदेश.
१८) अलीकडे, कोणत्या राज्यातील कोरापुटमधील काळा जिरे आणि रायगडा शाल यांना GI टॅग मिळाला आहे ?
उत्तर- ओडिशा .
१९) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ‘मुख्यमंत्री गुणवंत विद्यार्थी प्रोत्साहन योजना’ सुरू केली आहे ?
उत्तर- ओडिशा
२०) अलीकडे ‘ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३’ कोण प्रायोजित करेल ?
उत्तर- महिंद्रा समूह.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
२१) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले ट्रान्सजेंडर कोण ठरले आहेत ?
उत्तर- डॅनियल मॅकगेहे
२२) ४३ वी आसियान शिखर परिषद कोणत्या ठिकाणी आयोजीत करण्यात आली आहे?
उत्तर – जकार्ता
२३) कोणत्या अभिनेत्याला अलीकडेच FTII पुणेचे नवीन अध्यक्ष बनवण्यात आले आहे ?
उत्तर- आर माधवन.
२४) अलीकडे, उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊमध्ये काय बांधले जाईल ?
उत्तर- रामायण पार्क.
२५) अलीकडेच आकाशवाणी आणि वृत्तसेवा विभागाच्या प्रधान महासंचालकपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे ?
उत्तर- डॉ. वसुधा गुप्ता.
२६) अलीकडे कोणत्या देशात ‘गाई जत्रा उत्सव’ साजरा करण्यात आला ?
उत्तर- नेपाळ.
२७) उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.
२८) जन-गण-मन’ हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.
२९) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.
३०) ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
३१) भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.
३२) उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.
३३) भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पार्टील.
३४) जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.
३५) दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.
३६) भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.
३७) महाराष्ट्राला किती कि.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे ?
उत्तर- ७२० कि.मी
३८) राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे ?
उत्तर- ३५
३९) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
उत्तर- नाशिक
४०) इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ?
उत्तर- नरेंद्र मोदी
General Knowledge Questions And Answers In Marathi.
४१) व्हॅलेन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- १४ फेब्रुवारी
४२) हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स
४३) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो ?
उत्तर- अॅनिमिया (पंडुरोग)
General Knowledge Questions And Answers In Marathi.
इतिहासातील पाऊलखुणा
१) भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन.(१८६१)
२) नाटककार राजकुमार वर्मा यांचा जन्मदिन.(१९०५)
३) लेखक दया पवार यांचा जन्मदिन.(१९३५)
४) श्रीमती विजयालक्ष्मी पंडित यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.(१९५३)
५) दिल्ली दूरदर्शनचे प्रसारण सुरू.(१९५९)
६) साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांचा स्मृतिदिन.(२००८)
७) निना दावुलुरी पहिली भारतीय वंशाची मिस अमेरिका झाली.(२०१३)
८) शिवाजी महाराज सुखरुप राजगडावर पोहचले.(१६६६)
९) भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत.(१९४८)
१०) सवाई गंधर्व यांचे निधन.(१९५२)
११) रशियाचे ‘लुना 2’ हे यान चंद्रावर पोहोचले.(१९५९)
१२) भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने डारडेनेल् सामुद्रधुनी पोहून पार केले.(१९६६)
१३) मराठी साहित्य संशोधक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.(१९२६)
१४) अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्मदिन.(१९०९)
१५) संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्मदिन.(१९५०)
वॉरंटी आणि गॅरेंटीमध्ये फरक काय ?
वॉरंटी – एखाद्या उत्पादनासोबत वॉरंटी कार्ड देण्यात आले असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, दिलेल्या कालावधीत तुमची खरेदी केलेली वस्तू खराब झाली, तर दुकानदार ती दुरुस्त करून तुम्हाला परत करेल.
गॅरेंटी – उत्पादनावर हमी किंवा गॅरेंटी मिळते, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या उत्पादनाचे नुकसान होण्याची शक्यता कमी असते आणि नुकसान झालेच तर ती वस्तू दुकानदार किंवा कंपनीकडून बदलून नवीन दिली जाईल.
महाराष्ट्राचा भूगोल.
१) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे ?
उत्तर : १ मे १९६०
२) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?
उत्तर : १ मे १९६२
३) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत ?
उत्तर : यशवंतराव चव्हाण
४) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
उत्तर : श्री प्रकाश
५) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे ?
उत्तर : ३,०७,७१३ चौ.कि.मी.
६) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे ?
उत्तर : ७२० किमी
७) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ?
उत्तर : मुंबई
८) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे ?
उत्तर : कळसुबाई (१६४६मी.)
भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे.
- अन्नागुडई – २६९५- केरळ.
- दोडाबेट्टा – २६३७- तामीळनाडू.
- गुरुशिखर – १७२२- राजस्थान.
- कळसूबाई – १६४६- महाराष्ट्र.
- महेंद्रगिरी – १५०१- ओडिसा.
- मलयगिरी – ११८७- ओडिसा.
- पूर्वघाट लांबी- १,०९७ कि.मी.
- पश्चिम घाट लांबी – १,७०० कि.मी
हे देखील वाचा :
१६ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..