१४ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
१) मिस इंडिया २०२३ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर: नंदिनी गुप्ता
२) आशियाई कुस्ती स्पर्धा २०२३ मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर: सातव्या
३) लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर: आशा भोसले
४) भारतातील पहिले Apple स्टोअर कोठे सुरू करण्यात आले?
उत्तर: मुंबई
५) जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे राष्ट्र कोणते बनले आहे?
उत्तर: भारत
६) जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तीमध्ये भारतातील कोणत्या दोन व्यक्तींचे नावे आहेत?
उत्तर: शाहरुख खान, एस एस राजमौली
७) भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोणते?
उत्तरः जगन मोहन रेड्डी
८) इंडियन जस्टीस रिपोर्ट 2022 नुसार महाराष्ट्र पोलीस कितव्या क्रमांकावर आहे?
उत्तर: अकराव्या
९) भारतातील नवीन अस्तित्वात आलेला राष्ट्रीय पक्ष कोणता?
उत्तरः आम आदमी पार्टी
१०) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रेटर नोयडा येथे कशाचे उद्घाटन केले?
उत्तरः इंटरनॅशनल ट्रेंड शो
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) भारत आणि कोणत्या देशात वार्षिक नौदल समुद्री द्विपक्षीय अभ्यास ‘SIMBEX’ सुरु झाले आहे?
उत्तरः सिंगापूर
१२) इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चनुसार आर्थिक वर्षे २०२४ मध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज आहे?
उत्तरः ६.२ %
१३) भारतातील पहिली ‘ट्राफिक लाइट फ्री सिटी’ कोणत्या शहरात बनली आहे?
उत्तरः कोटा (राजस्थान)
१४) कोणत्या राज्यात विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री नाश्ता योजना सुरु करण्याची घोषणा झाली?
उत्तरः तेलंगणा
१५) आमदार प्रमिला मलिक यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्ष पदी निवड झाली आहे?
उत्तरः ओडिसा
General Knowledge Questions And Answers In Marathi.
* इतिहास प्रश्नावली *
१) महाराष्ट्रातील रामोशांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले?
उत्तरः उमाजी नाईक
२) उमाजी नाईक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?
उत्तरः पुणे
३) आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तरः वासुदेव बळवंत फडके
४) बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा झाली?
उत्तरः २६ ऑगस्ट १८५२
५) बॉम्बे असोसिएशनचे संस्थापक कोण आहेत?
उत्तरः नवरोजी फरदुनजी, जगन्नाथ शंकरशेठ
६) ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली?
उत्तरः दादाभाई नौरोजी
७) राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?
उत्तरः १८८५
८) “लोकहितवादी” असे कोणत्या समाजसुधारकास संबोधतात?
उत्तरः गोपाळ हरी देशमुख
९) पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना कोणी केली?
उत्तरः गोपाळ हरी देशमुख
१०) केसरी या वृत्तपत्राचे संपादक कोण होते?
उत्तरः गोपाळ गणेश आगरकर
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या साली पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली?
उत्तरः १८८०
१२) डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
उत्तरः २४ ऑक्टोबर १८८४ (गो. ग. आगरकर)
१३) “डोंगरीच्या तुरुंगातील १०१ दिवस व विकारविलसित” व “गुलामगिरीचे शस्त्र” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तरः गोपाळ गणेश आगरकर
१४) १८६५ मध्ये विधवा विवाह मंडळाची स्थापना कोणी केली?
उत्तरः न्या. महादेव गोविंद रानडे
१५) “एकेश्वर निष्ठांची कैफियत” हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तरः न्यायमूर्ती रानडे
General Knowledge Questions And Answers In Marathi.
* भूगोल प्रश्नावली *
१) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे?
उत्तरः ३०७७१३ चौ.कि.मी
२) पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नागपूर
३) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तरः रत्नागिरी (१६७ km).
४) महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तरः ७२० km
५) गोदावरी नदीचा उगम कोठे ‘आहे?
उत्तरः त्र्यंबकेश्वर
६) राधानगरी धरण गत्या नदीवर आहे?
उत्तरः भोगावती
७) कोराडी हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तरः नागपूर
८) जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तरः केळी
९) चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तरः वारणा
१०) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तरः ३६
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
उत्तरः बेसाल्ट
१२) नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर आहे ?
उत्तरः सातपुडा
१३) देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्र मध्ये किती आहे?
उत्तरः ५
१५) शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तरः राहता
१६) २०११ च्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात दर हजार बालकांमध्ये मुलांचे प्रमाण सर्वाधिक होते?
उत्तरः गडचिरोली
* वसंतराव नाईक समिती *
- शिफारसी: (२२६)
- त्रिस्तरीय पंचायतराजची स्थापना करावी.
- आमदार व खासदार – जिल्हा परिषदेवर सदस्यत्व देवू नये.
- जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व द्यावे. (प्रमुख जिल्हाधिकारी असावा.)
- प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ग्रामसेवक.
- संपूर्ण महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकच असावा.
- जिल्हा निवड समितीची स्थापना करावी.
- जिल्हाधिकारीचा जिल्हा परिषदेमध्ये हस्तक्षेप नसावा.
- १००० लोकसंख्येमागे १ ग्रामपंचायत.
* शून्य प्रहर *
- प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच शुन्य प्रहर सुरु होतो.
- गृहाचे नेहमीचे कामकाज सुरु होईपर्यंत चालतो.
- प्रश्नोत्तराच्या तासाचा जसा कामकाज प्रक्रियेच्या नियमात उल्लेख आहे तसा शुन्य प्रहराचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दा उपस्थित करण्यासाठी सदस्यांना उपलब्ध असलेला अनौपचारिक मार्ग आहे.
* इतिहासातील पाऊलखुणा *
- १५३४ – शिखांचे ४ थे गुरू, गुरू राम दास यांचा जन्मदिन.
- १८७३ – महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
- १९१५ – अभिनेते प्रभाकर मुजूमदार यांचा जन्मदिन.
- १९४० – इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू आरती साहा यांचा जन्मदिन.
- १९४८ – होंडा मोटर कंपनीची स्थापना.
- २००७ – भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ‘टी-२० विश्वकरंडक’ जिंकला.
हे देखील वाचा :
१३ जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..