११ जुलै आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?
General Knowledge Questions And Answers: स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील General Knowledge Question Answer In Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
General Knowledge Questions And Answers: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject General Knowledge Questions And Answers segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.
Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.
१) राज्यपालांना आपल्या पदग्रहणसमयी कोणाकडून पद व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते ?
उत्तर – उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
२) भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणी केली ?
उत्तर – बाबर.
३) भारतात ‘बँकांची बँक’ म्हणून कोणती बँक संबोधली/ओळखली जाते ?
उत्तर – भारतीय रिझर्व्ह बँक (RBI).
४) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता ?
उत्तर – रायगड.
५) महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे ?
उत्तर – कळसुबाई.
६) बेवसाईटवरील प्रथम दर्शनी दिसणारा भाग काय म्हणून ओळखला जातो ?
उत्तर – होम पेज.
७) जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी करण्याचे अधिकार कोणास असतात ?
उत्तर – जिल्हाधिकारी.
८) अष्टविनायकापैकी ‘वरदविनायक’ म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती रायगड जिल्ह्यात कोठे आहे ?
उत्तर – महाड.
९) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
उत्तर – नागपूर.
१०) महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे ?
उत्तर – तारापूर.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
११) उत्तम कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रीयन खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणता पुरस्कार दिला जातो ?
उत्तर – शिवछत्रपती पुरस्कार.
१२) गंगा नदी भारतातील किती राज्यांतून वाहते ?
उत्तर – पाच.
१३) ‘मॅकमोहन रेषा’ ही कोणत्या दोन देशांमधील सीमा रेषा आहे ?
उत्तर – भारत व चीन.
१४) अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ रोजी ‘जालियनवाला बाग हत्याकांड’ कोणी घडवून आणले होते ?
उत्तर – जनरल डायर.
१५) महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडून जातात ?
उत्तर – ४८.
१६) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर – पाडेगाव.
१७) सन १८२८ मध्ये कोलकाता येथे ‘ब्राम्हो समाज’ ची स्थापना कोणी केली ?
उत्तर – राजा राममोहन रॉय.
१८) महाराष्ट्रात एकुण ५ ज्योतिर्लिंग आहेत, त्यापैकी किती मराठवाडा विभागात आहेत ?
उत्तर – ३.
१९) बॉम्बे हाय हे ठिकाण कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ?
उत्तर – पेट्रोलियम.
२०) भारतीय ‘धवलक्रांतीचे जनक’ असे कोणास म्हटले जाते ?
उत्तर – डॉ. वर्गीस कुरियन.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
२१) जिल्हा परिषदेच्या फंडातून रकमा काढण्याचे अधिकार कोणास असतात ?
उत्तर – मुख्य कार्यकारी अधिकारी.
२२) हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला वैयक्तिक खेळात पहिले पदक मिळवून देणारा खेळाडू कोणता ?
उत्तर – खाशाबा जाधव.
२३) चहामध्ये कोणते उत्तेजक द्रव्य असते ?
उत्तर – टॅनिन.
२४) हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
उत्तर – बॅरोमीटर.
२५) डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर – अ-जीवनसत्व.
२६) लोकसंख्येचा विचार करता भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर – उत्तरप्रदेश.
२७) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?
उत्तर – हॉकी.
२८) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबाना वर्षातील किमान किती दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे ?
उत्तर – १०० दिवस.
२९) पाण्याचे रेणूसुत्र कोणते ?
उत्तर – H2O.
३०) ‘पंढरपूरी’ ही कोणत्या एका प्राण्याची जात आहे ?
उत्तर – म्हैस.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
३१) जास्त अंडी देणारी कोंबड्याची जात कोणती ?
उत्तर – व्हाईट लेग हॉर्न.
३२) पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे निर्माण होतात ?
उत्तर – पृथ्वीच्या परिवलनामुळे.
३३) किमान आधारभूत किंमत(MSP)किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती ?
उत्तर – कृषी खर्च व मूल्य आयोग.
३४) विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार ‘फिलामेंट’ म्हणून वापरली जाते ?
उत्तर – टंगस्टन.
३५) महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
उत्तर – सात.
३६) महाराष्ट्रात हरितक्रांतीची सुरुवात कोणी केली ?
उत्तर – वसंतराव नाईक.
३७) T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोवीड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा कुठे नियोजीत होती ?
उत्तर – ऑस्ट्रेलिया
३८) सध्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत ?
उत्तर – बाळासाहेब थोरात
३९) सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत ?
उत्तर – संजय कुमार
४०) ऑक्सफर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाला 2019 मधील ‘सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द’ म्हणून जाहीर केले आहे ?
उत्तर – संविधान
General Knowledge Questions And Answers In Marathi.
४१) २०१९ चा शांततेचा पुरस्कार कोणत्या देशाच्या पंतप्रधानाला मिळाला ?
उत्तर – इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली
४२) दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्रास विशेष प्राधान्य देण्यात आले होते ?
उत्तर – खाण-उद्योग
४३) भारतीय अन्न महामंडळाची स्थापना कधी करण्यात आली ?
उत्तर – १४ जानेवारी १९६५
४४) कोणत्या जिल्हयाचे पूर्वीचे नाव ‘कुलाबा’ असे होते ?
उत्तर – रायगड
४५) रेल्वे इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर – जॉर्ज स्टिफन्सन
४६) चंद्रपूर जिल्ह्यातील ‘बल्लारपूर’ हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर – कागद कारखाना
४७) महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?
उत्तर – मुंबई
४८) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तर – आंबोली
४९) ‘आधुनिक रसायनशास्त्राचा जनक’ कोणास म्हणतात ?
उत्तर – अँटाईन लॅव्हॅझिएर
५०) पेशींच्या अनियंत्रित व अनियमीत विभाजनामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर – कर्करोग
General Knowledge Questions And Answers In Marathi.
५१) बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर – १९७१.
५२) उत्तराखंडमधील कोणत्या शहराला ‘जागतिक योगा राजधानी’ असे म्हटले जाते ?
उत्तर – ऋषिकेश.
५३) इंग्लंडमध्ये ‘मायकेल ओडवायर’ चा खून कोणी केला ?
उत्तर – सरदार उधमसिंग.
५४) राजस्थानमध्ये ‘डेजर्ट फेस्टिव्हल/मरु महोत्सव’ कोणत्या ठिकाणी आयोजीत केला जातो ?
उत्तर – जैसलमेर.
५५) २ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
उत्तर – आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.
५६) ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा कोणी आणि कधी दिली ?
उत्तर – लालबहादूर शास्त्री/१९६५.
५७) ‘स्कर्व्ह’ हा विकार कोणत्या जीवनसत्त्वा अभावी होतो ?
उत्तर – क-जीवनसत्व.
५८) ‘ऑक्टोपस’ हे दहशतवाद विरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
उत्तर – आंध्रप्रदेश व तेलंगाणा.
५९) विभाजनपूर्व जम्मू आणि काश्मिर या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण बनल्या होत्या ?
उत्तर – मेहबुबा मुफ्ती.
६०) अलिबाग हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे ?
उत्तर – रायगड.
General Knowledge Questions And Answers In Marathi.
हे देखील वाचा :
१० जुलै चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.
तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.
तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील..