२९ जून आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर | Maharashtra General Knowledge Questions in Marathi 2024

२९ जून आजचे महाराष्ट्र सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर?

Maharashtra General Knowledge Questions in Marathi:स्पर्धा परीक्षा,पोलीस भरतीसाठी नेहमी विचारले जाणारे चालू घडामोडी आणि जनरल नॉलेजचे प्रश्न हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर वर्गांसाठी खूप महत्त्वाचे आहेत. राज्यसेवा परीक्षेमध्ये यावर ५ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आम्ही चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सैन्य भरतीपासून जिल्हा पोलीस, दारुबंदी पोलीस, वाहनचालक पोलीस, लोहमार्ग पोलीस, ग्रामीण पोलीस ते कारागृह पोलीस भरती परीक्षा अशी कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तुम्हाला या लेखातील Maharashtra General Knowledge Questions in Marathi प्रश्न आणि उत्तरे नक्कीच फायद्याची ठरतील.

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra Today’s General Knowledge Questions in Marathi: Police Bharti important questions and answers on current affairs and general knowledge are crucial for students preparing for competitive exams. These questions are also important for students in various classes, as civil services exams typically include 5 to 10 questions based on this subject.Maharashtra General Knowledge Questions in Marathi segment will help you stay updated on the latest current affairs in the Marathi language.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Whether you are preparing for any competitive exam, such as army recruitment, district police, anti-liquor police, motorist police, railway police, rural police, or branch police recruitment exams, this article on Police Bharti important (GK) questions and answers will be very useful for you.

१) कुंथलगिरी’ हे दिगंबर पंथीय जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः धाराशीव

२) कोणते एक शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते ?
उत्तरः छत्रपती संभाजीनगर

३) ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
उत्तरः चंद्रपूर

४) नांदेड जिल्हा वगळून कोणत्या जिल्ह्याचा समावेश नांदेड पोलीस परिक्षेत्रात होतो ?
उत्तरः परभणी,लातूर, हिंगोली

५) कोणत्या जिल्ह्याच्या सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही ?
उत्तरः धाराशीव

६) औंढा नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
उत्तरः हिंगोली

७) अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे ?
उत्तरः साबरमती

८) नागपूर हे ….. या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे.
उत्तरः मुंबई-कोलकाता

९) खरोसा लेण्या ….. जिल्ह्यात आहेत.
उत्तरः लातूर

१०) चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ….. तालुके आहेत.
उत्तरः १५

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

११) चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे ?
उत्तरः वैनगंगा

१२) वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कोठे आहे ?
उत्तरः परभणी

१३) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः रायगड

१४) नर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यातं आहे ?
उत्तरः अकोला

१५) महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता ?
उत्तरः नंदूरबार

१६) धुळे शहर कोणत्या नदी काठी वसलेले आहे ?
उत्तरः पांझरा

१७) पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण नदीवर आहे.
उत्तरः मुठा

१८) प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः नंदूरबार

१९) धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदूरबार जिल्हा कोणत्या साली निर्माण झाला?
उत्तरः १९९८

२०) कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही ?
उत्तरः बकरवाल

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

२१) बीड जिल्ह्यातील खालील ठिकाण ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखले जाते ?
उत्तरः नारायणगड

२२) मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तरः बीड

२३) मांजरा नदी कोणत्या तालुक्यात उगम पावते ?
उत्तरः पाटोदा

२४) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे ?
उत्तरः गडचिरोली

२५) विदर्भात एकूण जिल्हे किती ?
उत्तरः ११

२६) कोणत्या विर्भीय महिलेस अनाथाची माय म्हटले आहे ?
उत्तरः सिंधुताई सपकाळ

२७) महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखाना कोठे आहे ?
उत्तरः भिवंडी

२८) टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?
उत्तरः यवतमाळ

२९) अकोला जिल्ह्यातील वीज निर्मिती केंद्राचे ठिकाण कोणते?
उत्तरः पारस

३०) मुळा-मुठा नद्यांच्या काठावर कोणते शहर वसले आहे?
उत्तरः पुणे

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

३१) झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे ?
उत्तरः नागपूर

३२) …………हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा होय.
उत्तरः सिंधुदुर्ग

३३) प्रसिध्द अभिनेता राजा गोसावींचा जन्म सातारा जिल्ह्यातील ….. येथे झाला.
उत्तरः सिध्दश्वर कुरोली

३४) इस. १९२० मध्ये सातारा रोडला ….. यांनी डिझेल इंजिन बनवणारा देशातील पहिला कारखाना सुरू केला.
उत्तरः कुपर

३५) सातारा जिल्ह्यातील ………ही नगर पंचायत आहे.
उत्तरः मलकापूर

३६) सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली ?
उत्तरः १ मे १९८१

३७) महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते ?
उत्तरःआंबोली

३८) महाराष्ट्रातील अनुक्रमे पहिला व दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता?
उत्तरः सिंधुदुर्ग, वर्धा

३९) पनवेल, रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, गोवा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता ?
उत्तरः महामार्ग क्र. १७

४०) देऊळगावा राजा तालुक्यात खडकपूर्ण नदीवरील प्रकल्पाचे नाव काय आहे ?
उत्तरः चोखासागर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

४१) पश्चिम किनारपट्टीस समांतर असलेली … ही पर्वतरांग महाराष्ट्रात दक्षिणोत्तर पसरलेली आहे.
उत्तरः सह्याद्री

४२) उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांचे कोणत्या नावाने नामकरण करण्यात आले आहे ?
उत्तरः उपळा

४३) नाथसागर धरण कोठे आहे ?
उत्तरः पैठण

४४) संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी कोठे घेतली ?
उत्तरः आळंदी

४५) कोणता जिल्हा समुद्रकिनाऱ्यालगत नाही ?
उत्तरः कोल्हापूर

४६) कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही ?
उत्तरः मुंबई शहर

४७) मिहान प्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे ?
उत्तरः नागपूर

४८) महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे ?
उत्तरः बाभळी बंधारा

४९) आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे?
उत्तरः प्रवरानगर

५०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?
उत्तरः नागपूर

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

५१) ……..या शहरास महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले.
उत्तरः छ. संभाजीनगर

५२) महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?
उत्तरः नाशिक

५३) महाराष्ट्रात राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते ?
उत्तरः नागपूर

५४) सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च (CICR) कोठे आहे ?
उत्तरः नागपूर

५५) नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः गोंदिया

५६) संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ?
उत्तरः मोझरी

५७) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग यांची ‘सर्च’ (शोधाग्राम) संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तरः गडचिरोली

५८) गोदावरी व प्राणहिता या दोन नद्यांचा संगम कोठे झाला आहे ?
उत्तरःसिरोंचा

५९) गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री कोण आहे ?
उत्तरः (सध्या) देवेंद्र फडणवीस

६०) चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिध्द राष्ट्रीय उद्यान कोणते ?
उत्तरः ताडोबा

Maharashtra General Knowledge Questions in Marathi

Maharashtra General Knowledge Questions in Marathi
Maharashtra General Knowledge Questions

हे देखील वाचा : 

२८ जून चे जनरल नॉलेज जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तर.

तर विध्यार्थी मित्रांनो मला आशा आहे हे Maharashtra General Knowledge Questions in Marathi चे प्रश्न आणि उत्तरे वाचून तुमच्या ज्ञानात चांगली भर पडली असेल.

तुम्हाला जर का हा जनरल नॉलेजचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा. अशाच daily current affairs in Marathi Questions and answers आणि General Knowledge Questions Questions in marathi साठी आमच्या www.onlinebharti.com या वेबसाईट ला नियमित visit करा.

तुम्हाला शुभेच्छा !

Online bharti telegram channel

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.. 

Leave a Comment

x