Israel Hezbollah War Breaks Out Israeli Fighter Jets.
Israel Hezbollah War Breaks Out Israeli Fighter Jets: हिजबुल्लाहच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आज पहाटे हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला होता. त्यानंतर, लेबनॉनच्या सीमावर्ती भागात इस्रायलचे फायटर जेट्स घुसले आणि हिजबुल्लाहच्या अनेक तळांवर निशाणा साधत क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला.
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर इस्रायलने तात्काळ प्रत्युत्तर दिले. रविवारी इस्रायलच्या सैन्यांनी लेबनॉनमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. जवळपास १०० लढाऊ विमानांनी सीमावर्ती भागात हवाई हल्ले केले. इराण समर्थित हिजबुल्लाह ही संघटना मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती. Israel Hezbollah War Breaks Out Israeli Fighter Jets हिजबुल्लाहने लेबनॉनच्या भूमीवरून इस्रायलवर ३२० पेक्षा अधिक कत्युशा क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यांचा दावा आहे की त्यांनी वरिष्ठ कमांडर फहाद शुक्र यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला.
दोन आघाड्यांवर इस्त्रायल
दोन आघाड्यांवर इस्रायल लढत आहे. रविवारी सकाळी इस्रायलवर हल्ला झाल्याची पुष्टी हिजबुल्लाहने केली. त्यांच्या मते, बैरूत येथील कमांडरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्यांनी इस्रायलवर हल्ला चढवला होता. बैरूतच्या दक्षिण उपनगरात हिजबुल्लाहचा वरिष्ठ अधिकारी फवाद शुक्र ठार झाल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.
४८ तासांची आणीबाणी
हिजबुल्लाहविरोधात आक्रमक होत, इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव गॅलेंट यांनी पुढील 48 तासांसाठी आणीबाणी घोषित केली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उत्तरेतील या धुमश्चक्रीबाबत चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. “जो आमचे नुकसान करेल, आम्ही त्याचे नुकसान करू, त्याला करारा जवाब देऊ,” असे नेतान्याहू यांनी या बैठकीत स्पष्ट केले. याबाबत Times Of Israel च्या वृत्तातही उल्लेख आहे.
इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य अचूकपणे भेदल्याचा दावा करण्यात आला आहे. हिजबुल्लाहच्या रॉकेट लाँचर बॅरल्सवर हल्ला करून त्यांना नष्ट केल्याचा इस्रायलच्या लष्कराचा दावा आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या लेबनॉनमधील 40 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
इस्त्रायल-हिजबुल्लाहच्या तणावावर बायडेनची नजर.
इस्रायल-हिजबुल्लाह तणावावर अमेरिका बारीक नजर ठेवून आहे. इस्रायल-हिजबुल्लाह यांच्यातील तणावावर अमेरिकेचे लक्ष असल्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकारांचे अमेरिकेने समर्थन केले आहे, तसेच या भागात शांतता नांदावी हा अमेरिकेचा प्रमुख उद्देश असल्याचे बायडेन यांनी सांगितले.Israel Hezbollah War Breaks Out Israeli Fighter Jets.
हेही वाचा : हेजबोलाचा इस्रायलवर ३०० हून अधिक रॉकेटचा मारा; नेत्यानाहू म्हणाले, वाट्याला गेला तर…
मित्रांनो तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट योग्य वेळीहव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥