Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed In Malvan.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed In Malvan: मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र अवघ्या ८ महिन्यांनंतर शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. या घटनेनंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. तसेच विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, मोठमोठ्या शिखरावर अभेद्य असे किल्ले बांधले त्यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला आहे. संबंधित घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकांकडूनही संताप व्यक्त केला जात आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मालवणच्या किनाऱ्यावर असलेल्या राजकोट किल्ल्यात शिवरायांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आला होता. नौदल दिनाच्या दिवशी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. मात्र अवघ्या ८ महिन्यांत हा पुतळा कोसळला आहे.
भ्रष्टाचारामुळे ही घटना घडल्याचा दावा विरोधक करत आहेत. दरम्यान, पुतळा का कोसळला याची सर्व कारणे जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण घटनास्थळी भेट देणार आहेत. राजकोट किल्ला परिसर पूर्णपणे पोलिसांनी वेढला आहे. किल्ल्याच्या आत जाण्यास मनाई आहे.Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed पुतळ्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
०४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ला परिसरात मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरशिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा ३५ फुटी पुतळा उभारण्यात आला. मात्र हा पुतळा आज दुपारी कोसळला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी जवळपास ०५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. मात्र या पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती.
वैभव नाईक यांनी PWDचं कार्यालय फोडलं.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याने लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पुतळा कोसळल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsedभाजपकडूनही संशय व्यक्त जातोय.. पुतळा पडणे हे राजकारणाचे षडयंत्र असण्याची शक्यता असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला आहे.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांचा गंभीर आरोप.
मित्रांनो तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट योग्य वेळीहव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.
♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥