WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Breaking Short News: BMC Recruitment Terms And Condition 2024: बीएमसी कार्यकारी सहायक भरती मधील नियम बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी, प्रशासन ठाम, तिढा कधी सुटणार?

BMC Recruitment Terms And Condition News.

BMC Recruitment Terms And Condition News: मुंबई महापालिका भरतीमधील कार्यकारी सहायक पदासाठी निश्चित करण्यात आलेली अट बदलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी १,८४६ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी महापालिकेने काही अटी ठरवल्या आहेत, ज्यावर उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे. लिपिक पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती सुरू असली तरी, महापालिका प्रशासनाने घाललेल्या कठोर अटी अजूनही शिथिल केलेल्या नाहीत, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

इयत्ता दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याची अट काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पालिका प्रशासनाने उमेदवारांकडून दहावी व पदवी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागितले आहे. हे प्रमाणपत्र जोडल्याशिवाय अर्ज स्वीकारला जात नसल्याने, अनेकजण या भरती प्रक्रियेतून वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहेत.

भरतीसाठी अर्ज कुठं करता येणार?

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘कार्यकारी सहायक’ (लिपिक) पदाच्या १,८४६  जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २० ऑगस्टपासून सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ०९ सप्टेंबर २०२४ आहे.

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी आणि पदवी परीक्षा पहिल्या प्रयत्नात किमान ४५ % गुणांसह उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय, अर्ज भरताना पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा यूपीएससी परीक्षेत अशी अट नसली तरी, मुंबई महापालिकेने या भरती प्रक्रियेसाठी हा नियम लागू केला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार अर्ज करण्यापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी या नियमात बदल करण्याची विनंती केली असली तरी, महापालिका प्रशासनाने अजून कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे पुढे मुंबई महापालिका प्रशासन या भरतीच्या नियमांमध्ये कोणताही बदल करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भरतीची सविस्तर माहिती. 

विद्यार्थ्यांनी आणि राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही जाचक अट काढून टाकण्याची मागणी केली आहे. मात्र, मुंबई महापालिका या संदर्भात काय निर्णय घेईल, हे पाहावे लागेल.

मुंबई महापालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या १,८४६  रिक्त जागा BMC Recruitment Terms And Condition सरळ सेवा प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये अनुसूचित जाती (१४२), अनुसूचित जमाती (१५०), विमुक्त जाती-अ (४९), भटक्या जमाती-ब (५४), भटक्या जमाती-क (३९), भटक्या जमाती-ड (३८), विशेष मागास प्रवर्ग (४६), इतर मागासवर्ग (४५२), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (१८५), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (१८५), आणि खुला प्रवर्ग (५०६) याप्रमाणे रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

BMC Recruitment Terms And Condition

BMC Recruitment Terms And Condition

हेही वाचा : ज्या शिवरायांनी अभेद्य किल्ले बांधले त्यांचाच पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला, शिवप्रेमींमध्ये संताप. 

Maharashtra job whatsapp group

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट योग्य वेळीहव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचे सोशल मीडिया ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी आणि वेळेवर मिळत राहतील.

♥♥ || प्रगत भविष्यासाठी शुभेच्छा || ♥♥

Leave a Comment

नागपंचमी- आज चुकूनही हे करू नका ! तिरंग्यातील तीन रंगांचा अर्थ काय? ०६ ऑगस्ट – इतिहासातील पाऊलखुणा ! श्रावण महिन्यात कधी कोणती पूजा करावी? श्रावण महिन्यात काय करावे अन् काय नाही ! ०३ ऑगस्ट आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? ३१ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? पी.व्ही.सिंधूची विजयी सलामी-Paris Olympic 2024 Live Updates. २९ जुलै आजचे सामान्य ज्ञान सर्व महत्वाचे प्रश्न आणि उत्तर? Threatening Protesters Undermines President Tinubu’s Legacy – Amnesty Int’l